*कोंकण एक्स्प्रेस*
*सांडवे येथे नाचणी लागवड तंत्रज्ञानावर शेतकरी प्रशिक्षण*
*शिरगाव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील सांडवे येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य पिके वर्ष २०२५-२६ या योजनेंतर्गत “नाचणी लागवड तंत्रज्ञान” या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्रीमती. आरती पाटील यांनी केले. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस येथील शास्त्रज्ञ डॉ. भास्कर काजरेकर यांनी नाचणी लागवडीसाठी आवश्यक सुधारित तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमोल इढोळे यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये तालुका कृषी अधिकारी सौ. आरती पाटील, डॉ. भास्कर काजरेकर (कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस), तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निकेतन राणे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमोल इढोळे, कृषी सेवक श्री शिवाजी हाटोळे व श्री देव ठिकाणदार, श्री सुरेंद्र मसुरकर (अध्यक्ष – शेतकरी बचत गट) आणि माजी सरपंच सौ. नीलिमा मसुरकर यांचा समावेश होता.