*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा शास. निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग*
*बारावी वार्षिकसर्वसाधारण सभा संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इ. कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग ची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी मराठा समाज हॉल कुडाळ येथे संस्था अध्यक्ष मा.श्री. प्रसाद कुंटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी सन २०२४-२५ सालात उत्तीर्ण झालेल्या सभासद पाल्यांचा गुणगौरव तसेच सेवानिवृत्त सभासदांचा व सन २०१९-२० ते २०२४-२५ सालातील संचालकांचा सन्मान सोहळा पार पाडला. संस्थेने व्यवसायाचा १३ कोटी चा टप्पा केला असून संस्था स्वभांडवलाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तसेच संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी तसेच संस्थेचाच सेवानिवृत्त सभासदांनी संस्थेचे जास्तीत जास्त सभासद होऊन ठेवीत गुंतवणुक करावी तसेच पगार तारणावरती सुलभ प्रक्रियेने कर्ज उचल करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. सर्व सभासदांच्या खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली. यावेळी उपस्थित संस्था अध्यक्ष श्री. प्रसाद कुंटे, उपाध्यक्षा सौ. विनयश्री पेडणेकर, संचालक संजय गावडे, वसंतराव पाटोळे, राजेश कुडाळकर, दिलीप मसके, मंगेश राऊत, अर्जुन नाईक, दिनकर केळकर, लक्ष्मण वळवी, शंकर चव्हाण, शामराव बिरादार, हेमंत सावंत, प्रज्योत सावंत, तज्ज्ञ संचालक उदय शिरोडकर, नितीन आरोंदेकर, सल्लागार महेश गावडे, सचिव रामचंद्र दळवी, कर्मचारी वर्ग, माजी संचालक, सभासद, सेवानिवृत्त सभासद, गुणगौरव विदयार्थी.