*कोंकण एक्सप्रेस*
*’एक राखी व्यसनमुक्तीची’ डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून जि. प. कणकवली ३ च्या विद्यार्थ्यांनी घडवली सामाजिक ज्योती…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
“राखी” या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गेली १२ वर्षे प्रज्ञांगण तळेरेच्या माध्यमातून डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या मार्गदर्शनाने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जातो आहे. यंदा तेराव्या वर्षी, या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा कणकवली क्र. ३ च्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्वतः तयार केलेल्या सुंदर राख्या बांधल्या आणि त्या राख्यांमधून व्यसनमुक्तीचे सुंदर संदेश देऊन प्रबोधन केले.
या उपक्रमाचा उद्देश पोलीस अधिकाऱ्यांना राख्या बांधून व्यसनमुक्तीसाठी कठोर अंमलबजावणीची विनंती करत, समाजरक्षणाच्या भावनेने एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला.
अधिकारी वर्ग व मान्यवरांबरोबर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी वृषाली बर्वे – PSI नानचे सर – PSI कांबळे सर – PSI घरकर सर PSI तसेच पोलीस श्रीकांत कुंभार,तांबे मॅडम, वेंगुर्लेकर सर, सागर जाधव गोपनीय विभाग विनया सावंत, स्मिता माने, शाळा कणकवली क्रमांक ३ चे शिक्षक संतोष घाडीगावकर उपस्थित होते कार्य