कनेडी प्रशालेत आंतरराष्ट्रीय युवक दिन व कायदेविषय मार्गदर्शन शिबीर संपन्न

कनेडी प्रशालेत आंतरराष्ट्रीय युवक दिन व कायदेविषय मार्गदर्शन शिबीर संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*कनेडी प्रशालेत आंतरराष्ट्रीय युवक दिन व कायदेविषय मार्गदर्शन शिबीर संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत कणकवली तालुका विधी सेवा समिती, कणकवली यांचे मार्फत वार- मंगळवार, दिनांक- १२ ऑगस्ट २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मा.श्री.सतीश सावंत, यांनी शुभेच्छा देत युवाशक्ती व अणुशक्ती हा देशाचा आधार आहे, त्याचा योग्य त्या ठिकाणी वापर केल्यास देशाचा विकास होईल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिवाणी न्यायाधिश, कणकवली ॲड.एस.जी.लटुरिया यांनी AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा. AI तंत्रज्ञानाच्या साह्याने नवीन काही शिकू शकतात व अधिकचे ज्ञान मिळवता येते. प्रत्येक एडिटिंग फोटोच्या पाठिमागे एक मेटा डेटा असतो, प्रत्येक सायबर गुन्ह्यात त्याचा तपास करता येतो.अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा क्षेत्रात करिअर करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. तर शिस्त हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य अंग आहे भविष्यात आपण काय होणार आहात याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. देशाची प्रगती ही युवकांच्या हाती आहे. त्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ तयार करणे, टाकणे, मुलींचा पाठलाग करणे,रस्ते वाहतुकीच्या नियमांचा भंग करणे,विना लायसन्स गाडी चालवणे हे सर्व कायद्याने गुन्हे आहेत. त्यासाठी पोलीस खाते सक्रिय आहेत. विद्यार्थी हा भारताचे भविष्य आणि भवितव्य आहे, शालेय जीवन हे आयुष्यभरासाठी असते. याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे, मत पोलिस निरीक्षक कणकवली श्री.रविंद्र पन्हाळे साहेब यांनी व्यक्त केले. ॲड. मिलिंद सावंत यांनी रॅगिंग कायदा या विषयी जुजबी माहिती दिली, त्यात रॅगिंग ही येणाऱ्या काळाची मोठी समस्या आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची छेडछाड,मानसिक त्रास,दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यंगावरून बोलणे, अश्लील हावभाव, टोचून बोलणे इत्यादी संदर्भात रॅगिंग गुन्हा आहे. त्यासाठी कडक शिक्षा व दंड ही होतो.शालेय जीवनात गुन्हा झाला तर त्याचा प्रवेश रद्द देखील केला जाऊ शकतो.

जागतिक युवा दिनानिमित्त ॲड. बेलवलकर साहेब यांनी २०२५ च्या जागतिक दिनाची थीम “सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि त्या पलीकडे स्थानिक युवा कृती” या विषयी करिअर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून फिल्ड निवडावा, मित्र संगत चांगली असावी, योग्य ध्येय निवडल्यास यश निश्चित मिळते.

कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन श्री. आर.एच.सावंत, सदस्य श्री. चंद्रशेखर वाळके, श्री.बावतीस घोन्सालवीस, पोलीस कर्मचारी श्री.मकरंद माने, श्री.कुंभार, सौ. एम.एम. आचार्य, वरिष्ठ लिपिक विधी सेवा समिती, कणकवली आदी मान्यवर तसेच प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.सुमंत दळवी,उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार श्री.प्रसाद मसुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!