ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

*कोंकण एक्सप्रेस*

*ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले*

*पगार रखडण्यासाठी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आरोप*

*माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी*

*माध्यमिक शिक्षण विभाग बनतोय भ्रष्टाचाराचे कुरण*

*ऑफिस मधून फाईल नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व्हावी निलंबनाची कारवाई-शिक्षक परिषदेची मागणी*

*घाटमाथ्याच्या पायथ्याशी असलेला माध्यमिकचा कर्मचारी बनलाय शिक्षण विभागाचा एजंट-शिक्षक परिषदेचा घणाघात*

*शिक्षकांना भेटीस धरणाऱ्या कविता शिंपी यांचे तात्काळ सीईओनी करावे निलंबन- शिक्षक परिषदेची मागणी*

*सिंधुदुर्ग:*

ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी पण माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे महत्त्वाचे सण अंधारात जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते विलंबाने जाणार आहेत. त्याला सर्वस्वी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कविता शिंपी जबाबदार आहेत.अचानक 31 जुलैला रजा टाकून त्या रजेवर गेल्याने, अद्याप पर्यंत पगार झालेला नाही.खरतर रजेवर जाण्यापूर्वी रीतसर पगार बीलांवर सही नसल्याने समस्या निर्माण होणार आहे.हे कविता शिंपी यांना माहित होत. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुस्काटदाबी कशी करता येईल? हेच उद्दिष्ट ठेवून त्यांनी रजेवर जाण्याच ठरवलेल आहे. त्यामुळे शिक्षकांना वेठीस धरण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करून हायगय केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कडक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्यवाह नंदन घोगळे आणी कोकण विभागाचे कार्याध्यक्ष सलीम तकिलदार यांनी केली आहे. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी ही कारवाई करावी अशी लेखी मागणी शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती भरत केसरकर आणी नंदन घोगळे यांनी दिली आहे.

*अनेक प्रकरण आंगलट येणार म्हणून रजेची नौटंकी-शिक्षक परिषदेचा दावा*
माध्यमिक शिक्षणाधिकारी असलेल्या कविता शिंपी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारकीर्द अतिशय वादग्रस्त असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे. अनेक प्रकरणात त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम केले असून लाख रुपये भ्रष्टाचारी मार्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमवले आहेत.काही चुकीच्या, काही बोगस तर काही वेठीस धरून मान्यता देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना लुटण्याचे काम श्रीमती कविता शिंपी यांनी केले आहे. परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे काही चुकीचे काम केले आहे आणि भ्रष्टाचार मार्गाने पैसा कमावला आहे. ह्या सगळे गोष्टीची चौकशी होईल आणि पैसे दिले गेले नाहीत म्हणून जी अनेक कामे प्रलंबित ठेवली आहेत. त्या विरोधात काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्रदिनी 15 ऑगस्टला उपोषणाला बसतील. त्यामुळे हे सगळं प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकत. हे लक्षात आल्यानंतर 15 ऑगस्टच्या तोंडावरच श्रीमती कविता शिंपी ह्या मेडीकल रजेवर गेल्या असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे. तर त्याची रजेवर जाण्याचहीनौ पद्धत ही एक प्रकारची नौटंकी असून त्याची पण संपूर्ण चौकशी करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. पंधरा ऑगस्टला ही आंदोलन झाली, तर सर्व प्रश्नांची उत्तर द्यावे लागणार आणि आपलं पितळ उघड होणार.हे बींग फुटू धये म्हणून ही नौंटकी आहे.या वैद्यकीय रजेची खातेनिहाय चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी.आणी नौटंकी करणारा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी.यानंतर खरे सत्य बाहेर येईल. असा दावा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केला आहे. त्यामुळे त्यांनी जर खोटी मेडीकल रजा घेतली असेल तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशीही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केल्याने माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कविता शिंपी यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेटीज धरून मान्यता देताना कित्येक महिने ताटकळ ठेवलं होतं काही फाईल लपून ठेवण्याचे प्रकार त्यांनी केले होते त्या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांना करणार असल्याचे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले आहे.

*ऑफिसमधल्या फाईल घरी कोण घेऊन जातं?घाटमाथ्याच्या पायथ्याशी असणारा माध्यमिकचा कर्मचारी एंजट कोण?*
कार्यालयीन वेळ संपल्यानंतर काही कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यते संदर्भातील फाईल घरी घेऊन जाण्याचे प्रकार सध्या सुरू झाले आहेत. त्या फाईल घरी घेऊन गेल्यानंतर घाटमाथ्याच्या पायथ्याशी एका माध्यमिक शाळेत काम करणारा कर्मचारी हा कणकवलीत राहतो.या कर्मचाऱ्याला फाईल दाखवल्या जातात आणि त्यावर तो कर्मचाऱ्यांकडून टिपण्या कशा घालाव्यात याचे मार्गदर्शन घेतले जाते.यानंतर तो कर्मचारी कागदावर कच्च्या टिपण्या लिहून देतो.यानंतर दुसऱ्या दिवशी त्या फाईल पुन्हा ऑफिसमध्ये आणून त्यावर जाचक अटी आणि कडक टिपण्या घालून कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जाते. हा टिपण्या घालणारा एक घाटमाथ्याच्या पायथ्याखालील माध्यमिक कर्मचारी असून तो या मान्यता देण्यासंदर्भातील एक एजंट म्हणून काम करतोय. त्या एजंटासह या फाईल ऑफीसच्या बाहेर नेणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही यावेळी भरत केसरकर, नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांनी स्पष्ट केले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून माध्यमिक शिक्षण विभाग हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांनी दिलेले आदेश याची पायमल्ली माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी आणि या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करत असून त्यांच्यावर कडक अशी निलंबनाची कारवाईची मागणी स्वातंत्रदिनी भेटून पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून करणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्यवाह नंदन घोगळे,सलिम तकिलदार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!