*कोंकण एक्सप्रेस*
*सरकार मधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी ठाकरे सेनेचे सिंधुदुर्गनगरीत जनआक्रोश आंदोलन*
*सिंधुदुर्गनगरी*
महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला.विद्यमान सरकार मधील काही मंत्री बेताल वक्तव्य करीत आहेत, बार चलविणे, रमी खेळणे या सारखे निंदनीय प्रकार विधिमंडळात सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे नाव कलंकित झाले आहे. असे प्रकार राजरोस होत असतील तर अश्या मंत्र्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यात मातांची चोरी होते, मतदान चुकीच्या पद्धतीने घेतले जाते, हे उघड झाले आहे.आता सत्तेत असलेले मंत्री विधिमंडळात रमी खेळणे तसेच मंत्री बार चलवित असतील तर हे लाजिरवाने आहे तरी अश्या भ्रटाचारि व बदनाम मंत्र्यांची हकालपट्टी करा. या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यानुसार उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोस आंदोलन करण्यात आले व आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे सादर केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मधुरा पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,कन्हैया पारकर, आनंद ठाकूर,राजू राठोड,तात्या निकम, सचिन लोके, सिद्धेश राणे, वैभव सावंत,नित्यानंद चिंदरकर, अजित काणेकर, रवींद्र जोगल,मंगेश फाटक,सचिन पवार, बंटी पवार,वीरेंद्र नाईक, प्रतीक्षा साटम,हर्षा ठाकूर, सावंत, माधवी दळवी, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, नयना सावंत यांच्यासह सेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी शासन आणि भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला.