*कोंकण एक्सप्रेस*
*कोमसाप कणकवली शाखेच्या “श्रावणातील काव्यप्रवाह… कवी कट्टा” संमेलनात ख्यातनाम कवी रूजारिओ पिंटो यांची प्रमुख उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कणकवली शाखेतर्फे “श्रावणातील काव्यप्रवाह… कवी कट्टा” या काव्य संमेलनाचे आयोजन कणकवली शाळा क्र. ५ (शिवाजी नगर) येथे करण्यात आले आहे. या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून, ज्यांची लोकप्रियता दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे असे ख्यातनाम मराठी व कोंकणी कवी, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा संघटक श्री. रूजारिओ पिंटो उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नुकतेच फेरनिवड झालेले श्री. मंगेश मसके हजेरी लावणार असून, याप्रसंगी त्यांच्या सत्काराचा समारंभही पार पडणार आहे.
काव्यप्रेमींना आणि कवींना सादरीकरणाची संधी मिळणाऱ्या या संमेलनात जास्तीत जास्त कवींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष माधव कदम, कार्यवाह निलेश ठाकूर, संयोजक गणेश जेठे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री कल्पना मलये यांनी केले आहे.