लाखोंची दारुवाहतुक करणाऱ्या लक्झरी बस बांदा चेकपोस्ट वरून कशा सुटतात ?

लाखोंची दारुवाहतुक करणाऱ्या लक्झरी बस बांदा चेकपोस्ट वरून कशा सुटतात ?

*कोकण Express*

*लाखोंची दारुवाहतुक करणाऱ्या लक्झरी बस बांदा चेकपोस्ट वरून कशा सुटतात ?*

*मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे*

*सावंतवाडी ः  प्रतिनिधी*

झाराप पत्रादेवी रोडवर गुन्हा अन्वेषण विभागाने दोन लक्झरी बस वर कारवाई करत ४८ लाख ६१ हजाराची दारू बस सह जप्त केली आहे. परंतु या दोन्ही बस बांदा चेक पोस्ट वरून कशी काय सुटली, असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी उपस्थित केला आहे.

खाजगी बस सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी आहे. की दारू वाहतुकीसाठी यामागे झारीचा शुक्राचार्य कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी देखील त्यानी केली आहे. या बस फक्त आरटीओ कडे परमिट दाखवण्यासाठी थांबवला जातात. परंतु चेक पोस्टवर का थांबवल्या जात नाहीत. याचा अभ्यास जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करावा असे देखील ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!