*कोंकण एक्सप्रेस*
*पोंभुर्ले येथे तालुका स्तरिय शाश्वत शेती दिना निमित्त नाचणी लागवड प्रशिक्षण*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
मौजे पोंभुरले ग्रामनचयात येथे आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी *तालुकास्तरीय शाश्वत शेती दिन* व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके सन 2025-26 अंतर्गत *नाचणी लागवड तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे* आयोजन करण्यात आले
या कार्यक्रमारिता गावच्या सरपंच श्रीम.धावडे मॅडम उपसरपंच श्री. सादिक डोंगरकर, तालुका कृषी अधिकारी, देवगड श्रीम. आरती पाटील मॅडम, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मं.कृ.अ. शिरगाव मा. डॉ.बापूसाहेब लांबाडे सर, मं.कृ.अ., वाडा श्री. संभाजी जाधव साहेब, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, देवगड श्री. निकेतन राणेसाहेब, UNDP प्रकल्प समन्वयक श्रीम. दिपिका रावराणे मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.घाटग्यानावर मॅडम, सहाय्यक कृषी अधिकारी, पोंभुर्ले श्री.स्वप्निल तेली, आम्रधन फार्मर्स प्रॉडयुसर कंपनीचे सचिव श्री.जलाल डोंगरकर तसेच गावातील सर्व महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवर व उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे *प्रास्ताविक करून कृषीविभागाच्या योजनां* विषयी श्री.जाधवसाहेब यांनी मार्गदर्शन केले. *शाश्वत शेती दिनाविषयी व डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या हरितक्रांतीमध्ये असलेल्या योगदानाविषयी विषयी श्रीम.पाटील मॅडम* यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री.लांबाडे साहेब यांनी *शाश्वत शेती पद्धती व नाचणी लागवड तंत्रज्ञान* याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री निकेतन राणे यांनी *आत्मांतर्गत विविध उपक्रमांबाबत* मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन व स्वागत* श्री. स्वप्निल तेली यांनी केले. उपस्थित सर्वांकरिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.