कणकवलीतील पत्रकारांनी दिला “स्वच्छतेचा संदेश

कणकवलीतील पत्रकारांनी दिला “स्वच्छतेचा संदेश

  1. *कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीतील पत्रकारांनी दिला “स्वच्छतेचा संदेश”*

*कणकवली पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने सावडाव धबधबा परिसरात राबविली स्वच्छता मोहीम*

*कणकवली ः प्रतिनिधी*

वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सावडाव धबधबा परिसरात कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत पत्रकार व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आॅन फिल्ड उतरून परिसर चकाचक करत समाजातील विविध घटकांना स्वच्छतेता संदेश दिला. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील पर्यटन स्थळे स्वच्छ असली पाहिजे. जिल्ह््याबाहेरून येणाºया पर्यटकांना निसर्गरम्य परिसरासोबत त्याठिकाणचा परिसर स्वच्छ दिसल्यास आणखीन पर्यटकांचा ओढा वाढेल. त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल होईल. या उद्देशाने सावडाव धबधबा परिसरात पत्रकार संघातर्फे स्वच्छता मोहीम समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.
या स्वच्छता मोहिमेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर, प्रदेश प्रतिनिधी गणेश जेठे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीकांत भावे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष भगवान लोके, सावडाव उपसरपंच दत्ता काटे, सचिव संजय सावंत, खजिनदार रोशन तांबे, उपाध्यक्ष नंदू कोरगावकर, उमेश बुचडे, सचिन राणे, सहसचिव दर्शन सावंत, कार्यकारिणी सदस्य संजय बाणे, तुषार हजारे, महेश सावंत, तुषार सावंत, मिलिंद पारकर, माणिक सावंत, विवेक ताम्हणकर, रुपेश सामंत, पप्पू निमणकर, गुरुप्रसाद सावंत, हेमंत वारंग, स्वप्नील वरवडेकर, तुषार नेवरेकर, गणेश इस्वलकर, विराज गोसावी, विनोद जाधव यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सावडाव धबधबा परिसर ठिकाणी पत्रकार व ग्रामस्थ सकाळी एकत्र जमले. त्यांनी तीन एकर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत प्लाास्टिक पिशव्या, कचेच्या बॉटल्स यासह अन्य कचºयाचे १६ मोठ्या बॅग गोळा केला. त्यानंतर पत्रकार व ग्रामस्थांनी स्वच्छ भारत… सुंदर भारत, एक कदम…स्वच्छता के और, स्वच्छ भारत…. सुंदर सावडाव, भारत माता की जय, वंदे मातरम् यासह स्वच्छता विषयक अनेक घोषणाबाजी करत, दुकानदार, पर्यटक व ग्रामस्थांना हा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन पत्रकारांनी केले. या परिसरात असलेल्या स्टॉल धारक व पर्यटकांना गुलाबपुच्छ देऊन याठिकाणी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना परिसर अस्वच्छ होणार आहे, याची काळजी पर्यटक व ग्रामस्थांनी घ्यावी, असे आवाहन पत्रकारसंघातर्फे करण्यात आले. स्वच्छता मोहीम राबविल्याबद्दल अनेक पर्यटकांनी पत्रकार संघाच्या स्वच्छता विषयक उपक्रमाचे कौतुक केले. स्वच्छता मोहिमेला ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार्य केल्याबद्दल भगवान लोके यांनी दत्ता काटे यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या उपक्रमात सहभागी पत्रकार व सावडाव ग्रामस्थांचे स्वागत व आभार सचिन राणे यांनी मानले.
चौकट
स्वच्छ सुंदर पर्यटन स्थळे असल्यास पर्यटकांचा ओढा वाढेल
सिंधुदुर्ग जिल्ह््यातील सावडाव धबधबा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी येणाºया पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतानाच हा परिसर अस्वच्छ होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे जिल्ह््यातील पर्यटन स्थळांची स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. अन्य राज्यातील पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर असतात, त्याचप्रमाणे जिल्ह््यातील पर्यटन स्थळे स्वच्छ व सुंदर दिसली तर आणखीन पर्यटकांचा ओढा वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन जिल्ह््याच्या आर्थिकसमृद्धीत भर पडेल, असा विश्वास पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केला.
चौकट
पत्रकार संघाचा स्वच्छता विषयक उपक्रम स्तुत्य – दत्ता काटे
कणकवली तालुका पत्रकार संघ व सावडाव ग्रामपंचायतीने सावडाव धबधबा परिसरात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे उपक्रम स्तुत्य आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव धबधब्याचे सुशोभिकरण व सोयीसुविधा काम झाले आहे. सावडाव धबधबा प्रसिद्ध होण्यामागे पत्रकारांचे योगदान आहे. सावडाव धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना याठिकाणचा परिसर अस्वच्छ किंवा विद्रूप होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपसरपंच दत्ता काटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!