*कोंकण एक्सप्रेस*
*विध्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका श्रीमती सुरेखा वेरलकर यांचे निधन*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुक्यातील वेरली गावच्या रहिवाशी आणि माजी मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा उत्तम वेरलकर (८५) यांचे आज रविवारी सकाळी पावणे आठ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले विध्यार्थी प्रिय व सेवाभावी शिक्षिका म्हणून त्या परिचित होत्या
वेरली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रीमती सुरेखा वेरलकर यांनी सुमारे दहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम केले होते १९९८ मध्ये याच प्रशाळेतून त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या तत्पूवी त्यांनी तिरवडे, महान, डांगमोडे, राठीवडे याठिकाणी शिक्षिका म्हणून सेवा बजावली होती विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या श्रीमती सुरेखा वेरलकर यांनी ३२ वर्षे शिक्षण क्षेत्रात काम केले “वेरलकर बाई ” म्हणून त्या परिचित होत्या त्यांच्यावर आज दुपारी वेरली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मालवण येथील टोपीवाला हायस्कुलचे पर्यवेक्षक देविदास वेरलकर, आणि कालिदास वेरलकर यांच्या त्या मातोश्री होत तर भाजप ओबीसी महिला मालवण अध्यक्षा सौ पूजा वेरलकर यांच्या त्या सासूबाई तसेच दशरथ शंकर नीव्हेकर यांच्या त्या भगिनी होत
त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे