*कोंकण एक्सप्रेस*
*‘एक राखी व्यसनमुक्तीची’ – डॉ. नेरुरकरांच्या संकल्पातून RSETIने घडवली सामाजिक ज्योती*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
“राखी” या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत, गेली १२ वर्षे प्रज्ञांगण तळेरेच्या माध्यमातून डॉ. अनिल नेरुरकर (M.D., अमेरिका) यांच्या मार्गदर्शनाने ‘एक राखी व्यसनमुक्तीची’ हा आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जातो आहे. यंदा तेराव्या वर्षी, या उपक्रमात RSETI (Rural Self Employment Training Institute) च्या विद्यार्थ्यांनी सक्रिय पुढाकार घेत राख्या तयार केल्या आणि समाजात व्यसनमुक्तीची ज्योत प्रज्वलित केली.
या उपक्रमाचा उद्देश – प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, शिक्षण विभाग व पत्रकारांना राखी बांधून व्यसनमुक्तीसाठी कठोर अंमलबजावणीची विनंती करणे, तसेच माध्यमांच्या माध्यमातून व्यसनांचे दुष्परिणाम जनमानसात पोहोचवणे. राखीच्या या रेशीमधाग्यातून स्त्री-पुरुष भेद न करता, समाजरक्षणाच्या भावनेने एकत्र येण्याचा संदेश देण्यात आला.
अधिकारी वर्गांबरोबर हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी उपस्थित मान्यवर:
जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील.
अप्पर जिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे
निवासी जिल्हाधिकारी,श्री. मच्छिंद्र सुकटे
पोलीस अधीक्षक, डॉ. मोहन दहिकर
अप्पर पोलीस अधीक्षक, नायोमी साटम
जि. प. उप. कार्यकारी अधिकारी. श्री. जयप्रकाश परब –
कार्यक्रमाधिकारी, जि. प. शिक्षण विभाग,सौ. स्मिता नलावडे
लोकमत आवृत्ती प्रमुख,
श्री. महेश सरनाईक –
श्री. राजन चव्हाण
ज्येष्ठ पत्रकार
लहानगी स्पर्शिका मदभावे – “व्यसनमुक्त सिंधुदुर्ग करूया” या कवितेची सादरकर्ती
या प्रसंगी प्रज्ञांगणच्या संस्थापिका सौ. श्रावणी मदभावे म्हणाल्या,
“डॉ. नेरुरकर सरांच्या प्रेरणेतून आणि RSETIच्या सहकार्याने आज आपण व्यसनमुक्तीच्या कार्यात एक नवीन पाऊल टाकले आहे. या कार्यासाठी प्रशासन, पत्रकार, प्रशिक्षण संस्था आणि सामान्य नागरिकांची एकत्रित साथ अत्यावश्यक आहे.”
कार्यक्रमात लहानगी स्पर्शिका मदभावे हिने सादर केलेली कविता हा सर्वांचा मन जिंकणारा क्षण ठरला.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. नेरुरकरांच्या प्रज्ञांगण या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि पुढील काळातही साथ देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान:
श्री. संदेश कासले – प्रशिक्षक, बँक ऑफ इंडिया RSETI, सिंधुदुर्ग
सौ. सेजल गावडे – DST प्रतिनिधी.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे संचालक श्री. सतिश मदभावे यांनी केले.