*कोंकण एक्सप्रेस*
*कोल्हापूर येथील राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या प्रतिक्षा सराफदार सुर्वपदकाच्या मानकरी!*
*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*
ऑलम्पिक वीर नीरज चोप्रांच्या स्मरणार्थ कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्गची सुकन्या प्रतीक्षा सूर्यकांत सराफदार ( कुडाळ ) हिने 36.45 मीटर्स भाला फेकून सुवर्णपदक पटकवले आहे.
या गुणवंत खेळाडूचे अॅथलॅस्टिक असोसिएशन सिंधुदुर्गच्यावतीने कल्पना तेंडुलकर, किरण पिंगुळकर,बाळकृष्ण कदम, अध्यक्ष रणजित सिंग राणे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.