*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन सन कणकवली पोलिस बांधवांसोबत.*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या मुलींच्या एनसीसी विभागाने व स्काऊट गाईड विभागाच्या मुलींनी रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस बांधवांकडे असते अनेक संकटांना तोंड देत पोलिस बांधन सर्वसामान्य जनतेची सतत सेवा करत असतात आपल्या कुटुंबापासून दूर असतात अशा पोलिस बांधवांच्या जीवनात बहिण भावांचे प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत यासाठी विद्यामंदिर प्रशालेतील एनसीसी व स्काऊट गाईड विभागातील मुलींनी राखी बंधनांच अनोखा उत्सव कणकवली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस बांधवां समवेत राखी बांधण्याचा उपक्रम पार पाडला या उपक्रमाला मार्गदर्शन एनसीसी मुलींच्या विभागाचे ऑफिसर विज्ञान शिक्षिका सौ शर्मिला केळुसकर स्काऊट विभागाच्या शिक्षिका सौ विद्या शिरसाट यांनी केले . प्रशालेचे मुख्याधापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्यूतराव वणवे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ . सौ साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब व संस्थेचे पदाधिकारी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .