*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन सण उत्साहात साजरा….*
*दोडामार्ग ः शुभम गवस*
रक्षाबंधनाचा सणानिमित्त दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला.
या उपक्रमात महिला पदाधिकाऱ्यांनी प्रथम दोडामार्ग पोलीस ठाण्यात भेट देऊन सर्व पोलीस बांधवाना राखी बांधली.
यानंतर तहसील कार्यालयात जाऊन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली. प्रशासनातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतानाही या कर्मचाऱ्यांनी राखी बांधून घेताना भावनिक प्रतिसाद दिला.
तसेच एस.टी. महामंडळाच्या दोडामार्ग आगारातील चालक, वाहक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा राखी बांधून सणाचा आनंद लुटला.
या उपक्रमात शिवसेना महिला तालुका प्रमुख सौ. चेतना गडेकर, महिला शहर प्रमुख सौ. शितल हरमलकर, मनेरी विभाग प्रमुख सौ. गुणवंती गावडे, उपशहर प्रमुख सौ. रसिका गावडे व सौ. संजीवनी गवस यांचा सक्रिय सहभाग होता.