*कोंकण एक्सप्रेस*
*दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात ABVP तर्फे रक्षाबंधन साजरे…*
*दोडामार्ग / शुभम गवस*
रक्षाबंधन या पवित्र सणानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दोडामार्ग शाखेतर्फे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व अन्य कर्मचारी यांना राखी बांधून त्यांच्या सेवाभाव व त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थिनी कार्यकर्त्यांनी “आरोग्यसेवा हीच खरी सेवा” हा संदेश देत, आजारपणात आणि आपत्कालीन प्रसंगी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. मिठाईचे वाटप करून सणाचा गोडवा वाढवण्यात आला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच समाजातील विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी असे उपक्रम राबवत असते. यापूर्वीही ABVP दोडामार्ग शाखेने पोलीस, शाळा शिक्षक, तसेच इतर शासकीय विभागांमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरे करून भावबंध दृढ केले आहेत.
या कार्यक्रमास ABVP च्या कार्यकर्त्या, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.