*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची १० ऑगस्टला कुडाळ येथे बैठक*..
*सिंधुदुर्ग / शुभम गवस*
जिल्हा वीज ग्राहक संघटना, सिंधुदुर्गची तातडीची बैठक रविवार दिनांक १० ऑगस्ट रोजी एम.आय.डी.सी. रेस्ट हाऊस, कुडाळ येथे संध्याकाळी ठीक ३ ते ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.
१५ ऑगस्टला होणाऱ्या लाक्षणिक उपोषण बाबत सूक्ष्म नियोजन नियोजन करणे, जिल्हा कार्यकारिणीमध्ये आवश्यक फेरबदल करणे, आठही तालुका कार्यकारिणीचा आढावा घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. तरी वीज जिल्हा व तालुका कार्यकारणी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्हाध्यक्ष संजय लाड, समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.