*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेत नेहा केळूसकर विजयी*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेत नेहा नामदेव केळुसकर विजयी झाल्या. तर पल्लवी दयानंद शिर्सेकर या द्वितीय विजेत्या आणि भाग्यश्री भिवा माळकर या तृतीय विजेत्या तर तरण्णूम बांगी चतुर्थ विजेत्या ठरल्या.
या स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष होते. या स्पर्धेस पद्मश्री परशुराम गंगावणे, मराठी टीव्ही मालिका अभिनेते विरेश कांबळी, विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या दोन्ही अतिथीनी स्वतः नारळ लढवून नारळ लढवणे स्पर्धेची सुरवात केली. दशकपूर्ती सोहळा असल्याने प्रारंभी सिंधुरत्न महिला फुगडी ग्रुपचा फुगडी, – गोफनृत्य या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात आमदार निलेश राणे व अभिनेते विरेश कांबळी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. स्थानिक बाल कलाकार
विभूती ढोके, स्वराली मोरे, माही पारकर, मंत्रा कोळंबकर, हर्षाली पाडगावकर यांचे कोळी व लावणी नृत्य सादरीकरण केले. शहरातील बाल जादूगार निखिल विशाल ओटवणेकर याचे जादूचे प्रयोग प्रयोग सादर झाले. सांस्कृतिक परंपरा चांगल्या प्रकारे मंडळाकडून जपली जातेय असे कौतुकोद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले.
या स्पर्धेत ३१५ महिला स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेत धावपट्टू लीना धुरी यांनी खास सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजयी नेहा नामदेव केळुसकर यांना सोन्याची नथ व पैठणी सोबत १० लाखाचा विमा, द्वितीय विजेत्या पल्लवी दयानंद शिर्सेकर यांना सोन्याची नथ व पैठणी सोबत १० लाखाचा विमा, तृतीय विजेत्या भाग्यश्री भिवा माळकर यांना चांदीची पैंजण व पैठणी आणि चतुर्थ विजेत्या तरण्णूम बांगी यांना चांदीची पैंजण व पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व विजेत्यांना आर्या मुणगेकर यांच्याकडून आयुर्वेदिक स्किन केअर किट तसेच सहभागी महिलांना हेल्थ वर्क आउट ऑनलाईन लिंक द्वारे आरोग्यविषयी मोफत मार्गदर्शन करणारी कुपन देण्यात आली. तर लकी ड्रॉ विजेत्या शुभदा पराडकर यांस मोबाईल बक्षीस देण्यात आला.
या स्पर्धेस माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, दत्ता सामंत, सुदेश आचरेकर, सुगंधा साटम, उमेश नेरुरकर, दीपक पाटकर, हरी खोबरेकर, मिलिंद मेस्त्री, बाबा परब, महेश कांदळगावकर, जॉन नऱ्होना, परशुराम पाटकर, राजू बिडये, बाबी जोगी, दिलीप घारे, आप्पा चव्हाण, लायन्स अनुष्का चव्हाण, राधिका मोंडकर, मनाली दळवी, सोनाली पाटकर, पूनम चव्हाण, वैशाली शंकरदास यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
मंडळाच्या सल्लागार ऍड. अमृता अरविंद मोंडकर वं विद्या फर्नांडिस यानी या विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. सूत्रसंचालन गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे व रेश्मा खंदारे – नागवेकर यांनी केले. ऍड. अमृता मोंडकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, गणेश पाडगाकर, विद्या फर्नांडिस, रेश्मा नागवेकर, आर्या आशिष मुणगेकर, कोळंब सरपंच सिया चेतन धुरी, वायरी उपासरपंच प्राची पराग माणगावकर, योगिता कुबल, मंडळाच्या सल्लागार – नोटरी वकील अमृता मोंडकर, स्नेहल मेथर, ममता कुबल, केदार केळूसकर, भूषण खोत, शुभदा पाडगावकर, प्रतिभा मोंडकर, पराग माणगावकर, काळसेकर, यतीन सुरेश खोत, मंडळाचे बाल पदाधिकारी हर्षाली पाडगावकर, सारा फर्नांडिस, अवनीश मेथर, आर्यन कुबल, निल नागवेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.