*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांना औक्षण करून बांधले राख्या*
*मालवण | प्रतिनिधी*
मालवण शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे औक्षण करून रक्षाबंधन करण्यात आले. रक्षाबंधन निमित्ताने महिला भागिनींनी आमदार निलेश राणे यांची मालवण येथील निलरत्न निवास्थानी भेट घेऊन राखी बांधल्या.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा सहसचिव कवीता मोंडकर, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, उप तालुका प्रमुख प्रियांका मेस्त्री, अल्पसंख्यांक शहरप्रमुख मार्टिना फर्नांडिस, उपविभाग प्रमुख लुद्दीन फर्नांडिस, कुडाळ तालुकाप्रमुख रचना नेरुरकर, रेखा काणेकर आदी उपस्थित होत्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, शिवसेना मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा प्रवक्ते राजा गांवकर यावेळी उपस्थित होते.