*कोंकण एक्सप्रेस*
*भालचंद्र मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने आयोजित ‘भालचंद्र चषक २०२५’ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ*
*माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भालचंद्र मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने विद्यामंदिर शाळेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे, परेश परब, टायलेश सावंत, प्रद्युम मुंज, अमजद शेख, अक्षय चव्हाण, रूपेश वाळके, रूपेश केळुसकर, रुचिर ठाकूर, अभि चव्हाण, चिन्मय माणगावकर, रुदरेश लाडगावकर, किरण सावंत, दीपक देऊळकर, तुषार मोरे, शिवलिंग पाटील, उदय यादव, प्रियांका कोरगावकर, सुशांत सावंत, ओंकार हळदीवे, समीर कमलापुरे, रूपेश साळुंखे आदी मान्यवर व कबड्डी प्रेमी उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.