कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात शैलेश नाईक यांचा विजय

कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात शैलेश नाईक यांचा विजय

*कोंकण एक्सप्रेस*

कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात शैलेश नाईक यांचा विजय*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात शैलेश नाईक यांनी विजेतेपद पटकाविताना १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषकावर आपले नाव कोरले तर उपविजेता म्हणून गौरव बामजी यांना घोषित करण्यात आले या स्पर्धेमध्ये मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, खारेपाटण सिंधुदुर्ग या ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते

मालवण येथील सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या कै. दादा आचरेकर स्मरणार्थ भव्यदिव्य राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला होता. हे सामने दोन गटामध्ये खेळविण्यात आले. दोन्ही गटातील सामने रोमहर्षक व अतितटीचे झाले. या स्पर्धेमध्ये शैलेश नाईक यांनी आपले एकहाती वर्चस्व गाजविले. अलिबाग येथील शैलेश नाईक (ब) यांनी प्रथम क्रमांक पटकाविले तर अलिबाग येथीलच गौरव बामजी (अ) यांनी द्वितीय क्रमांक पटकावित रोख रक्कम ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, मुंबई येथील आसीफ खुरेशी (अ) तृतीय क्रमांक रोख रक्कम १५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तर आसीफ खुरेशी यांच्या (ब) संघाने चतुर्थ क्रमांक रोख रक्कम ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक पटकाविले. तसेच उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ म्हणून शैलेश नाईक यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. व उत्कृष्ट प्रहार अलिबाग येथील पंकज रांजणकर याला आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या वतीने गौरविण्यात आले.

यावेळी सतीश आचरेकर यांनी सांगितले की, सलग ९ वर्षे ही स्पर्धा अविरतपणे सुरु आहे. काही कारणास्तव मधली तीन वर्षे मला ही स्पर्धा घेता आली नव्हती परंतु रॉयल ब्रदर्स या मंडळाने गेली ३ वर्षे ही स्पर्धा सुरु ठेवली. त्यानंतर यावर्षी महाराष्ट्रातील पहिलीच एवढ्या रकमेची ही स्पर्धा आपल्या मालवणमध्ये भरविण्याचे ठरविले आणि आज ही स्पर्धा सत्यात उतरली आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी आपली स्पर्धा असेच समजून काम करत असल्याने ही स्पर्धा कोणतेही गालबोट न लागता यशस्वी होत आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय तुल्यबळ असे संघ सहभागी झाले असल्याने या स्पर्धेला एक वेगळी रंगत निर्माण झाली होती. या स्पर्धेसाठी रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, तुषार मसुरकर व निलेश वेर्णेकर यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगत विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी निलेश वेर्णेकर, संजय घरत, सागर तिगडी, मनोज मयेकर, बुवा तारी, निशाद हिरनाईक, प्रसाद घरत, मॉन्टी तारी, बाबा जोशी, विकी चोपडेकर, आशिष नार्वेकर, संजय सारंग, प्रसाद घरत, विपुल राऊळ, शैलेश नाईक, मोहन म्हात्रे, शंकर अण्णा घरत, नितेश हडकर, गुणेश हडकर, रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ यांचा सतीश आचरेकर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे कार्यकर्ते रोहन आचरेकर, आनंद आचरेकर, तुषार मसुरकर, बाबल नहोना, दर्पण सादये, कुलराज बांदेकर, रॉनी फर्नांडीस, राज जाधव, हर्ष मिठबावकर, ओंकार यादव, शुभम मिठबावकर, सचिन साळगावकर, कुणाल मालवणकर, कल्पेश मसुरकर, विश्वास आचरेकर, मंदा अंधारी, रोहित जोशी, रेघन नहोना, भावेश पारकर, आदिनाथ खुरंदळे, ध्रुव आचरेकर, फ्रान्सिस नहोना व इतर उपस्थित होते.

स्पर्धेचे समालोचन सातारा येथील डॉ. भाग्यश्री शिंदे व मालवण येथील अक्षय मालवणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!