*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बंड्या सरमळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत सलोनी खवणेकर अंतिम विजयी*
*मालवण : प्रतिनिधी*
मालवण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व बंड्या सरमळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत सलोनी खवणेकर या अंतिम विजयी ठरल्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बंड्या सरमळकर मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मानाची नारळ लढवणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी व्यासपिठावर शिवसेना माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुकासमन्वयक मंदार ओरसकर, महिला आघाडी तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना जिल्हाप्रमुख मीनाक्षी मेथर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळी महिला तालुका पदाधिकारी यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये नारळ लढवणे, लहान मुलांचे वेशभूषा, लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच खास प्रेक्षक वर्गालाही लकी ड्रॉ चे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी विजेत्या प्रथम क्रमांक सलोनी खवणेकर स्पर्धकास सोन्याची नथ, द्वितीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास यतिका मयेकर टॉवर फॅन, तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकास हेमांगी आचरेकर गॅस शेगडी, चतुर्थ क्रमांक विजेत्या दिशा पेडणेकर स्पर्धकास इस्त्री व प्रेक्षकातून विजेत्या पूर्वा आयरेकर स्पर्धकास पैठणी देण्यात आली. स्पर्धेतील तीन स्पर्धकांना आकर्षक पैठणी म्हणून बक्षिस देऊन सन्मानित करून गौरविण्यात आले.
वेशभूषा स्पर्धेतील लहान मुलांना खास आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम निशा धुरी, द्वितीय नक्ष घाडीगावकर, तृतीय गरिमा केळुसकर व उत्तेजनार्थ अस्मि भगत,आराध्या टेमकर यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर बाबी जोगी, श्वेता सावंत, रूपा कुडाळकर, भाग्यश्री लाकडे खान, सचिन मालवणकर, सिद्धेश मांजरेकर, अन्वय प्रभू, किरण वाळके, हेमंत मोंडकर , मनोज मोंडकर, माधुरी प्रभू, नीना मुंमबरकर, रश्मी परुळेकर, नरेश हुले, महेश जावकर, सोनाली डीचवलकर, दादा जोशी, गणपत आडिवरेकर, चिंतामणी मयेकर, भगवान लुडबे, मंदा जोशी,अक्षय भोसले, चंदू खोबरेकर, नारायण रोगे, रवी मिटकर, तृप्ती मयेकर, राहुल जाधव, सुधीर चिंदरकर, प्रथमेश सरमळकर, विशाल सरमळकर , भार्गव खराडे, संदेश लाड, यशवंत गावकर, प्रसाद चव्हाण, दीपक देसाई, लक्ष्मी पेडणेकर, गौरव वेर्लेकर, दादा पाटकर, प्रथमेश बिरमोळे, पूजा तळाशीलकर, किशोर गावकर, सुर्वी लोणे, गजा नेवाळकर, राधिका मोंडकर आदी उपस्थित होते.