श्री माधवराव पवार विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी साजरे केले अनोखे रक्षाबंध
श्री माधवराव पवार विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी वैभववाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारीवृंद वैभववाडी एसटी स्थानकचे कर्मचारी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी त्याचबरोबर वैभववाडी शहरातील रिक्षा चालक बांधव यांना स्वनिर्मित राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे करत समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे . प्रशालेतील सुमारे 80 विद्यार्थिनींनी यामध्ये एनसीसी ग्रुप व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असणारा हा सण संपूर्ण भारत वर्षामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो श्री माधवराव पवार विद्यालयांमध्ये ज्येष्ठ शिक्षिका सौ.भरडकर,मॅडम पल्लवी काळे मॅडम, जिमखाना मंडळ प्रमुख तांबे मॅडम, स्काऊट गाईडच्या प्रमुख हिरुगडे मॅडम,इको क्लब प्रमुख सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी सुमारे 100 हुन अधिक राख्या बनविल्या. शालेय परिसरातील झाडांना राखी बांधून विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धन व संरक्षण एक काळाची गरज आहे हा वसा जोपासत वैभववाडी परिसरातील पोलीस स्टेशन, एसटी स्टँड,आरोग्य विभाग व सर्वांमध्ये नेहमी परिचित असणारे रिक्षात चालक-मालक या सर्वच क्षेत्रातील कर्मचारी बांधवांना राख्या बांधत एक अनोखा उपक्रम साजरा करत समाजामध्ये एक नवीन आदर्श घालून दिला आहे. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक कदम सर ज्येष्ठ शिक्षक पाटील, सर घावरे सर,नंदकर सर, वाडेकर सर,शिरोडकर सर, शिपाई संदीप उभे, कृष्णा नारकर, संदीप बेळेकर उपस्थित होते.