खारेपाटण तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

खारेपाटण तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*खारेपाटण तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न*

*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील खारेपाटण तळेरे प्रभागातील चार केंद्रांतील 116 प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा परिषद शाळा कासार्डे क्र. १ येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात शिक्षकांना AI च्या संकल्पना, प्रकार, आणि प्रत्यक्ष शैक्षणिक वापर याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन पालकमंत्री मा. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. रविंद्र खेबुडकर यांच्या आदेशानुसार करण्यात आले. कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पवार सर तसेच कासार्डे शाळेचे मुख्याध्यापक आनंद तांबे यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून सतीश मदभावे (संस्थाचालक, श्रावणी कॉम्प्युटर, तळेरे) व मंगेश गुरव (संस्थाचालक, यश कॉम्प्युटर, खारेपाटण) यांनी सहभाग घेतला. त्यांनी विविध AI साधनांचा शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल याचे सविस्तर व सुलभ मार्गदर्शन केले. यात ChatGPT, Google Gemini, Copilot, Deepseek, SlidesAI, Magic School AI, Curipod यासारख्या उपयुक्त टूल्सची माहिती देण्यात आली. याशिवाय प्रॉम्प्ट तयार करण्याचे तंत्र, AI चा वापर करून निबंध लेखन, अभ्यासपत्रिका, सादरीकरण, भाषांतर, ऑनलाईन क्विझ तयार करणे याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. शिक्षणात AI चा वापर केल्यास शिक्षकांचे काम अधिक सुलभ होऊन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळेल, असा विश्वास मार्गदर्शकांनी व्यक्त केला.

या उपक्रमात ‘MS-CIT powered by AI’ या नवीन अभ्यासक्रमाच्या सुरुवातीचीही घोषणा करण्यात आली. हा अभ्यासक्रम संगणक शिक्षणासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या तंत्रज्ञानाची मूलभूत ओळख व उपयोग शिकवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरल्याची प्रतिक्रिया दिली. AI तंत्रज्ञानामुळे शिक्षणात सकारात्मक बदल घडवता येतील, अशी भावना अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी वर्गाचे तसेच मार्गदर्शकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!