*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला बंदर येथे नारळी पौर्णिमा उत्साहात*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला येथे आज नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नागरिकांबरोबरच पोलिस ठाणे, तहसील कार्यालय, पत्रकार समिती, विविध संस्था, लोकप्रतिनिधी आणि व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वेंगुर्ला बंदर नारळी पौणिमा सण साजरा करण्यात आला. बंदर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. नागरिकांनी या खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला. किरकोळ स्वरूपात पावसानेही या सणाला हजेरी लावली.