*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी*
*आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन व दर्याला श्रीफळ अर्पण केले*
*मालवण दि प्रतिनिधी*
शिवकालीन ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मालवणात नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मालवण व्यापारी संघाने दर्याला श्रीफळ अर्पण केले यावेळी आमदार निलेश राणे यांनीही समुद्राचे पूजन करत मच्छिमार, व्यापारी आणि नागरिक यांच्या सोबत श्रीफळ अर्पण केले.मच्छिमारांची, व्यापाऱ्यांची, तमाम नागरिकांची भरभराट होऊ देत असे साकडे यावेळी सागराला घालण्यात आले.
मालवण बंदरजेटी येथे शहरातील मालवण व्यापारी बांधव बाजारपेठ हनुमान मंदिर येथून पारंपरिक वाद्य मिरवणूकीने अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या सोबतीने आले. श्रीफळ पूजन झाले. या सोहळ्यात आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांसह, व्यापारी, नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त यावर्षीही मालवण बंदर जेटीवर विविध आयोजकांच्या वतीने नारळ लढविण्याच्या स्पर्धा रंगल्या. यामध्ये सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजपा यांच्या वतीने महिलांसाठी तर सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे पुरुषांसाठी नारळ लढविण्यांची भव्य स्पर्धा घेण्यात आली. चार स्पर्धांचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ठाकरे शिवसेनेच्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.