*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा हा भविष्यात योगासनाची पंढरी होईल. – प्रकाश कोचरेकर*
*कासार्डे प्रतिनिधी: संजय भोसले*
स्पर्धकांचा उत्साह आणि उपस्थिती पाहता भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा हा योगासनाची पंढरी होईल. असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रवर्तक व कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर यांनी काढले. ते सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी व्यासपिठावरून बोलत होते.
या स्पर्धा ओरोस येथील जिजामाता हॉस्पिटल हॉलमध्ये भरवण्यात आल्या होत्या. ते पुढे म्हणाले की सरावात सातत्य असेल तर जिल्ह्यातील विद्यार्थी राज्य स्तरावर सुद्धा आपला झेंडा फडकवू शकतात. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा मोरे, सचिव डॉक्टर तुळशीराम रावराणे, राष्ट्रीय योगासन प्रशिक्षक संजय भोसले, माजी जिल्हा सदस्य व कुडाळ तालुका प्रभारी रविंद्र पावसकर,पंच श्वेता गावडे, अॅडवोकेट वर्षा गावकर, डॉक्टर दिपाली पाळेकर, नीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
वयोगट १० ते 14 ( मुले )
सुपाईन , प्रथम-भावेश धोंडी घाडीगावकर.
फॉरवर्ड बेंड-
१)हितेश महेश डिचोलकर.
२)भावेश धोंडी घाडीगावकर.
ट्वीस्टिंग बॉडी –
१)हितेश महेश डिचोलकर, २)लोकेश कृष्णा कुडाळकर.
१०ते 14 मुली
फॉरवर्ड बेंड –
१)गिरीजा मंगेश मोहिते.
२)शिफा बुलंद पटेल.
३)आरुषी विलास रांबाडे.
४)गार्गी किशोर नारकर
ट्वीस्टिंग बॉडी
१) शिफा बुल्लंद पटेल.
२) सिद्धी हरीओम प्रसाद.
बॅकबेंड-
१) गिरीजा मंगेश मोहिते.
२)रिद्धी हरिओम प्रसाद.
14 ते 18 मुले
बॅकबेंड –
१)मयूर सुभाष हड्सी( सुपाईन)
ट्वीस्टिंग बॉडी –
१)आयुष अवधूत बागवे.
14 ते 18 मुली
ट्रॅडिशन –
१)प्रणाली किसन ठोंबरे.
२)मधुरा प्रसाद गुरव.
३)दिव्या अक्षय काटे.
फॉरवर्ड बेंड
१) प्रणिता किसन ठोंबरे
२) गार्गी पुरळकर
३)मधुरा गुरव
ट्वीस्टिंग बॉडी –
१)काव्या मुक्तानंद गौंढळकर २)अस्मि सचिन राव
३)गार्गी चंद्रकांत परळकर
बॅकबेंड -प्रथम
काव्या मुक्तानंद गौंढळकर.
वयोगट 35 ते 45
महिला, ट्रॅडिशनल –
१)शांती शक्ती देसाई.
२)अरुणा किसन ठोंबरे.
३)मानसी दत्तात्रय अटलेकर. ४)स्मिता गोविंद गोवेकर. ५)वैशाली दिलीप घाडी.
ट्वीस्टिंग बॉडी.
प्रथम-
मानसी दत्तात्रय आठवलेकर.
वयोगट 45 ते 55
ट्रॅडिशनल (महिला )
१)मनीषा उमेश कोरगावकर २)श्वेता शरद जोंधणकर ३)अमिता नितीन शेट्टी
पुरुष
१)किसन दिनकर ताम्हणकर २)किसन सुरेश ठोंबरे
३)रामा वासुदेव पालजी.
इंडिव्हिजिबल
महिला वयोगट 45 ते 55
प्रथम-
मनीषा उमेश कोरगावकर .
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले. तसेच सदर स्पर्धेला पंच म्हणून कुडाळ तालुका प्रभारी रवींद्र पावसकर , संजय भोसले, रावजी परब ,डॉक्टर तुळशीराम रावराणे, श्वेता गावडे, नीता सावंत ,डॉक्टर दिपाली पाळेकर, अरुणा ठोंबरे, किरण ठोंबरे, प्रकाश कोचरेकर, डॉक्टर वसुधा मोरे ,तेजल कुडतरकर, आनंद सावंत, अॅडवोकेट वर्षा गावकर, तुपकर मॅडम, डॉक्टर रेवती लेले, मानसी आठवलेकर, विवेक राणे, इत्यादींनी काम पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक व परिसरातील प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.दोन दिवस चाललेल्या या स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.