*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या भारतीय सैनिकांना सीमेवर पाठविल्या*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सृजनात्मक कल्पकतेने शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रंगांच्या आणि आकारांच्या आकर्षित राख्या तयार करून भारत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सिमेवर पाठवून दिल्या प्रशालेमार्फत एक हजार राख्या तयार करून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली . मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम यांनी या उपक्रमाविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थी व शिक्षक / पालक यांच्या सहकार्यातून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना सैनिकांच्या बद्दल असणारे देशप्रेम व्यक्त करण्याचे शिक्षण देण्यात आले प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थांना सहकार्य केले

मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री तवटे साहेब चेअरमन डॉ सौ साळुंखे मॅडम सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब विश्वस्त अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या

