*कोंकण एक्सप्रेस*
*व्यापारी महेश नार्वेकर यांचे निधन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली : कणकवली शहरातील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष महेश चंद्रकांत नार्वेकर (४४) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
नार्वेकर यांना गुरुवारी काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ती स्वतःच कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल गेले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचारनंतर घरी आले. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्यांचे निधन झाले. महेश नार्वेकर हे मनमिळाऊ व दारशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. शहरातील सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. सदाहसतमुख व मोठा मित्रपरिवार असलेले व्यापारी अशी त्यांची ओळख होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ, बहीण, पुणते, पुतण्या असा परिवार आहे. कणकवलीचे माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर तर प. पू. भालचंद्र संस्थानाचे खजिनदार दादा नार्वेकर यांचे बंधू होत. त्यांच्या अकाली निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.