*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग शहरातील वाढत्या मोकाट गुराबाबत नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन लक्ष वेधले…….*
*दोडामार्ग – शुभम गवस*
कसई दोडामार्ग नगरपंचायत कार्यक्षेत्रात दोडामार्ग बाजारपेठ, चारही रस्त्यावर, बस स्थानक तहसीलदार कार्यालय, तसेच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट पाळीव जनावरे यांचा सुळसुळाट झाला आहे. वाहनधारक, नागरीक हैराण झाले आहेत. या गुरांचा बंदोबस्त करण्याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांच्या नेतृत्वाखाली कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांची भेट घेऊन लक्ष वेधले. कसई दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष मुख्य अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेत, कारवाईबाबत गुरांच्या मालकाना कल्पना दिली जाईल. पाळीव जनावरे यासाठी गोशाळा सुरू केली जाणार आहे. तसेच आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तेव्हा अवजड वाहनांना वेळेचे बंधन घालावे, जेणेकरून बाजारपेठमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. याकडे लक्ष वेधले.
दोडामार्ग बाजारपेठेमध्ये खाण्याचे पदार्थ ही मुदत संपली तरी विक्री केली जाते. असा एक प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे मुदतबह्य पदार्थ विक्री करतात याची तपासणी करावी अशी मागणी केली. दोडामार्ग बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी होवू नये यासाठी जादा पोलिस कर्मचारी नेमणूक करणे, गणेश चतुर्थी सण जवळ आला आहे. वर्दळ वाढणार आहे. तेव्हा नगरपंचायतीकडून आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच इतर समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस, प्रदीप चांदेलकर, संदीप गवस, सुदेश तुळसकर, गौतम महाले, उल्हास नाईक, उपस्थित होते.