*कोंकण एक्सप्रेस*
*मंत्रालयात मंत्र्यांना बांधली व्यसनमुक्तीची राखी..*
*नशाबंदी मंडळाचा उपक्रम; सिंधुदुर्गसह राज्य व्यसनमुक्त करण्याचे आवाहन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
नशाबंदी मंडळाने मंत्रालयात विविध मंत्रिमहोदयांना व्यसनमुक्तीची राखी बांधून “व्यसनमुक्तीशी बंधन-व्यसनांपासून रक्षण” या अभिनव अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमातून सिंधुदुर्ग सह संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करा असे आवाहन करण्यात आल्याची माहिती नशाबंदी मंडळाच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांनी दिली.
नशाबंदी मंडळाच्या कोकण विभागातील संघटकांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि भा.प्र.से. सचिव हर्षदीप कांबळे यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून समाजातील वाढत्या व्यसनांना आळा घालण्याची विनंती केली. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगरातील संघटक अर्पिता मुंबरकर, रविंद्र गुरचळ, मिलिंद पाटील, चेतना सावंत आणि दिशा कळंबे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.