राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने उद्या विरण बाजारपेठेत नारळ लढविणे स्पर्धा*

*मालवण ः प्रतिनिधी*

राकेश परब मित्र मंडळाच्या वतीने उद्या गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर, विरण बाजारपेठ येथे नारळ लढवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेतील प्रथम पारितोषिक ५ हजार रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये व आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मंडळातर्फे ५ नारळ दिले जातील. प्रथम येणाऱ्या ७० स्पर्धकांना प्राधान्य असेल. तसेच मद्यपान करून कोणताही खेळाडू आढळला तर त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश फी २०० रुपये असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यश पांजरी-9834192959 याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!