*कोंकण एक्सप्रेस*
*जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत सृष्टी पटेलचे नेत्रदिपक यश*
*कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सृष्टी मणिलाल पटेल हीने जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून नेत्रदीपक यश मिळविले आहे.
ओरोस येथिल जिल्हा मुख्यालय क्रिडा संकुलात ६ ऑगष्ट रोजी जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धा पार पडल्या. या जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १२ वी कला शाखेत शिकत असलेल्या सृष्टी मणिलाल पटेल हिने १९ वर्षाखालील ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून चमकदार कामगिरी केली आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशालेचे क्रिडा शिक्षक आदीनाथप्रसाद गर्जे प्रविण शेट्ये यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. तिने मिळविलेल्या यशाबद्दल शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबइंचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्था पदाधिकारी व संचालक, शाळा समितीचे चेअरमन विजयकुमार कदम व सर्व सदस्य, मानद अधिक्षक संदीप साटम, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.