तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाजपा सिधुदुर्गच्यावतीने  १४ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वा. वेंगुर्ला हायस्कूल येथे पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये वेंगुर्ला तालुका मर्यादित भव्य समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता आणि शिस्त वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी एका शाळेला एकाच गटामध्ये सहभागी होता येईल. दोन्ही गटात प्रथम नावनोंदणी करणा-या फक्त १० संघांनाच प्रवेश दिला जाईल. गीत सादर करताना ते राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी किवा संस्कारक्षम आणि मराठी, हिदी किवा संस्कृत भाषेतील असावे. सादरीकरणाची वेळ ७ मिनिटे आहे. गीताला संगीत साथ म्हणून हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ आदींचा वापर करावा. रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा वापरण्यास सक्त मनाई आहे.  गीत सादर करताना शाळेस किवा गीतास साजेसी अशी असावी. बॅनर आणि नृत्यसदृश्य हालचाली वर्ज्य असून शुद्ध गायन व सुसंवादावर भर असावा.
माध्यमिक गटातील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे ३५००, २५००, १५००, ५००, ५०० तसेच चषक आणि प्रमाणपत्र तर प्राथमिक गटातील प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे २५००, २०००, १०००, ५००, ५०० तसेच चषक आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. इच्छुक शाळांनी १० ऑगस्टपूर्वी सई चेंदवणकर (७७१९९८३०६३) यांच्याकडे नावनोंदणी करावी. जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!