उत्कृष्ट काम करणा-या महसूल कर्मचा-यांचा गौरव

उत्कृष्ट काम करणा-या महसूल कर्मचा-यांचा गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*उत्कृष्ट काम करणा-या महसूल कर्मचा-यांचा गौरव*

*वेंगुर्ला प्रतिनिधी –  प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला तहसील कार्यालय येथे महसूल दिन आणि महसुल सप्ताह प्रारंभ कार्यक्रम तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उत्कृष्ट काम करणा-या महसूल कर्मचा-यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
वेंगुर्ला तहसील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस, पुरवठा निरीक्षक विजय पवार, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, पोलिस उपनिरीक्षक श्री.गवारे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व महसूल कर्मचा-यांनी चांगले काम करावे आणि नावलौकिक मिळवावा असे आवाहन केले. यावेळी सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ठ काम केलेले महसुल सेवक साक्षी वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर कनयाळकर, पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री, ऋतुजा नाईक, शिपाई एस.व्ही.तुळसकर, पांडुरंग तुळसकर, ग्राम महसूल अधिकारी सायली आंदुर्लेकर, ज्ञानेश्वर गवते व चारूशिला वेतोरकर, महसुल सहायक चारूशिला  शेवडे, गितेश बोवलेकर, सहाय्यक महसुल अधिकारी  मिनल रेडकर, लक्ष्मण गावडे आणि मंडळ अधिकारी क्रांती निग्रे व निलेश मयेकर आदी वेंगुर्ला तालुक्यातील कर्मचा-यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!