*कोंकण एक्सप्रेस*
*कासाईनाथ पर्वत स्वच्छता अभियान – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
*स्थानिक पातळीवर पर्यावरण जागृतीस चालना*
*दोडामार्ग, शुभम गवस*
– आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग (मुदतवाढ शिक्षण व विस्तार विभाग) यांच्या वतीने कासाईनाथ पर्वत येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात १५ विद्यार्थी, ७ विद्यार्थिनी आणि ८ प्राध्यापकांनी सहभाग घेतला.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि घाण दूर करून निसर्गरम्य ठिकाणी स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी श्रमदानाच्या माध्यमातून सामाजिक भान दाखवले.
हा उपक्रम फक्त स्वच्छतेपुरताच मर्यादित नसून, निसर्ग संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण जपण्याबाबतची जाणीव निर्माण करणारा ठरला आहे. महाविद्यालयाच्या Department of Lifelong Learning and Extension च्या अंतर्गत अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सहभाग आणि नेतृत्वगुण वाढवण्याचा उद्देश आहे.