जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १९ महिन्यांचे थकीत मानधन मिळणार : रवींद्र खेबुडकर

जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १९ महिन्यांचे थकीत मानधन मिळणार : रवींद्र खेबुडकर

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १९ महिन्यांचे थकीत मानधन मिळणार : रवींद्र खेबुडकर*

*४ कोटी ६४ लाख ६० हजार अनुदान प्राप्त, लवकरच खात्यात जमा होणार..*

*ओरोस : प्रतिनिधी*

जिल्ह्यातील ६३८ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव गोड जाणार आहे. सप्टेंबर २०२० ते मार्च २०२२ या १९ महिन्यांचे राज्य शासनाचे थकीत मानधन त्यांना मिळणार आहे. यासाठी ४ कोटी ६४ लाख ६० हजार ५५४ रुपये अनुदान शासनाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून हे अनुदान पंचायत समिती कार्यालयाजवळ वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

सोमवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या बैठक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेला सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना खेबुडकर यांनी जिल्ह्यात ६३८ ग्राम पंचायत कर्मचारी आहेत. यामध्ये दिवाबत्ती पाहणारे ६९, लिपिक ३४, पाणी पुरवठा कर्मचारी १८८, सफाई कामगार ७ आणि शिपाई ३७० असा समावेश आहे. शासनाने लोकसंख्येनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला आकृतीबंध मंजूर केलेला असतो. त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी नियुक्त करीत असते. या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत आणि शासन मानधन देत असते. सप्टेंबर २०२० पासून राज्य शासनाचे मानधन मिळाले नव्हते. ते आता मार्च २०२२ पर्यंतचे मानधन प्राप्त झाले आहे. लवकरच हे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे मानधन जमा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!