*कोकण Express*
*सावंतवाडी न.पा.च्या हेड्रॉलिक शिडीचे लोकार्पण*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पालिकेच्या माध्यमातून हेड्रोलिक शिडी आणण्यात आली असून शहरातील वीज खांबावरील काम करणे आता सहज शक्य होणार आहे. यामुळे आता शहरातील वीज खांबावरील मीटरवरील उंच काम करता येणार आहे असे कंपनीचे प्रमोद बोरा यांनी स्पष्ट केले. यासाठी १२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या शिडिचं लोकार्पण नगरसेवक मनोज नाईक यांच्या हस्ते हे करण्यात आले. यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांनी विशेष प्रयत्न केले होते. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगावकर, बंटी पुरोहित, प्रदीप सावरवाडकर आदी उपस्थित होते.