साळशी-सरमळेवाडी शाळेला रावले कुटुंबीयांकडून गोदरेज कपाट भेट

साळशी-सरमळेवाडी शाळेला रावले कुटुंबीयांकडून गोदरेज कपाट भेट

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी-सरमळेवाडी शाळेला रावले कुटुंबीयांकडून गोदरेज कपाट भेट*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील साळशी-सरमळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला रावले कुटुंबीयांकडून गोदरेज कपाट भेट म्हणून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन देण्यात आलेली ही उपयुक्त भेटवस्तू शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या भेटवस्तूचे अनावरण नुकत्याच शाळेत पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळेतील साहित्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होणार असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज शैक्षणिक वातावरण लाभणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी रावले कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले आणि ही मदत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेले प्रेरणादायी योगदान असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमप्रसंगी विठोबा रावले, सुरेश कदम, शांताराम रावले, अनंत पवार, राजेंद्र साटम, मुख्याध्यापक समाधान कोळी, देवणेवाडी अंगणवाडी सेविका प्रतिक्षा शिवलकर, मदतनीस सध्या नाईक, शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!