*कोंकण एक्सप्रेस*
*लातुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्गातील १७ ज्युदो पट्टुंची निवड*
*वेंगुर्ले,कासार्डे,आंबोली, सावंतवाडी व फोंडाघाट मधील खेळाडूंचे यश*
*कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले*
सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशन वतीने कासार्डे ता . कणकवली येथे आयोजित सब ज्युनिअर जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेतून १७ खेळाडुंची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुनित बालन ग्रूप प्रस्तूत ५२ वी सब-ज्युनिअर महाराष्ट्र राज्य स्पर्धा आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा दि.२२ ते २४ ऑगस्ट रोजी गिरवलकर मंगल कार्यालय लातुर येथे होणार आहे.
जिल्हास्तरीय सब-ज्युनिअर निवड चाचणीचा निकाल पुढीलप्रमाणे –
सब ज्युनिअर मुले-
२५-३० कि.ग्रॅ.वजनगट
ध्रूव शेट्ये ( कासार्डे)- प्रथम,श्रेयस कुंभार (तळवडे)- व द्वितीय, यशराज दुपडे व पार्थ टकेकर ( आंबोली) – तृतीय
३०-३५कि.ग्रॅ.वजनगट
ओम पाटील ( आंबोली)- प्रथम,स्वरूप मरगाळे ( आंबोली ) द्वितीय व सौरभ मांजरेकर ( आंबोली) – तृतीय
३५-४० कि.ग्रॅ.वजनगट
यश कडव( सावंतवाडी) – प्रथम, ईश्वर सिंग ( बांदा) – व्दितीय,अश्विन खरते ( बांदा) व सोहम घेवडे ( आंबोली )- तृतीय
४०-४५ कि.ग्रॅ.वजनगट
दुर्वांग नातू( फोंडाघाट)- प्रथम, अश्मेश लवेकर ( कासार्डे) व्दितीय,गौरेश खानविलकर ( बांदा) व यशराज राऊळ( आंबोली) – तृतीय
४५-५०कि.ग्रॅ.वजनगट
कुणाल गोवेकर ( आंबोली)- विजेता,नील परब ( आंबोली) – उपविजेता
५०-५५ कि.ग्रॅ.वजनगट
आरव कणबरकर(
५५-६० कि.ग्रॅ.वजनगट
६०-६६कि.ग्रॅ.वजनगट
अविनाश करंगुटकर(बांदा)- प्रथम
६६ कि.ग्रॅ.वरील खुला वजनगट
मयूरेश परब( सावंतवाडी)- प्रथम
सब ज्युनिअर मुली-
२३-२८कि.ग्रॅ.वजनगट
कु.प्रिती क्षिरसागर ( कासार्डे)- विजेती
२८-३२कि.ग्रॅ.वजनगट
कु.मानवी म्हारव( वेंगुर्ले)- विजेती
कु. कनिष्का कोकरे ( कासार्डे)- उपविजेती,
३२-३६कि.ग्रॅ.वजनगट
कु. स्वरा दळवी ( सावंतवाडी)- प्रथम
कु.काव्या तळवणेकर ( सावंतवाडी) – द्वितीय
कु.समृध्दी मराठे( कासार्डे) व कु. पुर्वा केणी(आंबोली) – तृतीय
३६-४० कि.ग्रॅ.वजनगट
कु. दृष्टी मुंड्ये( सावंतवाडी)-प्रथम
कु.प्रेरणा काजरेकर (सावंतवाडी)- द्वितीय ,कु.अन्वी गावडे व कु. पौरवी जाधव ( सावंतवाडी) – तृतीय,
४०-४४कि.ग्रॅ.वजनगट
कु. कृष्णाई रावराणे ( फोंडाघाट)-प्रथम,
कु. युगा गुंजाळ (सावंतवाडी)- द्वितीय
कु. मयुरी जाधव (सावंतवाडी) व कु. आराध्या गोसावी -(सावंतवाडी) -तृतीय
४४-४८कि.ग्रॅ.वजनगट
कु.ऋतुजा चव्हाण ( फोंडाघाट) – प्रथम
कु.लावण्या केसरकर( सावंतवाडी)- द्वितीय
कु. हर्षदा परब – (सावंतवाडी)- तृतीय
५७ कि.ग्रॅ.वरील खुला वजनगट
कु. अस्मी ठुकरूल ( कासार्डे)- विजेती
कु. सलोनी रेडेकर(आंबोली)- उपविजेती
या यशस्वी खेळाडूमधून विजेत्या १८ खेळाडुंची राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो
असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली ,या स्पर्धेला पंच म्हणून मुख्य प्रशिक्षक व अभिजीत शेट्ये,सोनू जाधव आदींनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. याप्रसंगी मंगेश घोगळे,उमरफारूक मुन्शी,दिनेश जाधव,अजिंक्य पोकळे,कु.प्रतिक्षा गावडे ,कु.स्वप्निली कदम आदी प्रशिक्षक तसेच कु.रिद्धी राणे,कु.मंथली मुणगेकर,दूर्वास पवार, शुभम राठोड आदी वरिष्ठ खेळाडू उपस्थित होते.
निवड झालेल्या खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या ठिकाणच्या जिल्हास्तरीय स्पर्धेला सावंतवाडी,बांदा,आंबोली,वेंगुर्ले,
कुडाळ, फोंडा,तळवडे,हरकुळ बुद्रुक व कासार्डे,येथील ज्यूदो क्लबच्या ५० पेक्षा अधिक सब ज्युनिअर खेळाडुंनी सहभाग घेतला होता.