फोंडाघाट येथे महसूल सप्ताह निमित्त विविध दाखल्यांचे वाटप

फोंडाघाट येथे महसूल सप्ताह निमित्त विविध दाखल्यांचे वाटप

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट येथे महसूल सप्ताह निमित्त विविध दाखल्यांचे वाटप*

*फोंडाघाट /गणेश इस्वलकर*

महसूल सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत कार्यालय फोंडाघाट येथील सभागृहामध्ये लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान या कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी फोंडाघाट ग्रामपंचायतच्या सरपंच मा.श्रीम.संजना आग्रे मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.एम.बी.मंडले रावसाहेब नायब तहसीलदार (महसूल) तहसील कार्यालय कणकवली, फोंडाघाट मंडळ अधिकारी श्री प्रविण मोंडे, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, लोरे नं. १ चे ग्राम महसूल अधिकारी श्री शिंदे,फोंडाघाट महाविद्यालय प्राध्यापक विनोद पाटील, ग्राम विस्तार अधिकारी मंगेश राणे, कृषी सेवक परब मॅडम, फोंडाघाट तलाठी समृद्धी गवस मॅडम,ग्रा प सदस्य मिथिल सावंत,ग्रा प सदस्य तथा फोंडाघाट एज्यु. सोसा. चे माजी चेअरमन सुभाष सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरकुळ खुर्द च्या ग्राम महसूल अधिकारी श्रीमती शिंदे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थिताना समजावून सांगितली. यानंतर फोंडाघाट सरपंच सौं संजना आंग्रे व विकास सेवा सोसायटी चेरमन राजन नानचे उपस्थितान समोर मनोगत व्यक्त करत महाराजस्व अभियांतर्गत विविध दाखले वाटप कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी लोरे नं. १ चे ग्राम महसूल अधिकारी श्री शिंदे यांनी ऍग्री स्टॅक व ई पिक पहाणीबाबत माहिती दिली व उपस्थितांना मुदतीत ई पीक पहाणी करणेबाबत आवाहन केले.
दरम्यान सदर कार्यक्रमांतर्गत संजय गांधी योजनाचे ४ लाभार्थी यांना लाभ मंजूर झाल्याबाबत संबंधित लाभार्थी यांना मा. तहसीलदार साहेब कणकवली यांचेकडील मंजूर लाभ आदेशाच्या प्रति वितरित करण्यात आल्या. तसेच संजय गांधी योजनेच्या ४ लाभार्थ्यांना सत्यापण सर्टिफिकेटचे वितरणही करण्यात आलं. एका रेशन कार्डचे वितरण करण्यात आलं त्याचप्रमाणे ४ खातेदार यांना सातबाराचे वाटप करण्यात आले तसेच सदर राजस्व  अभियानांतर्गत विविध दाखल्याचे वितरण करण्यात आले त्यामध्ये उपन्न दाखले -७, वय अधिवास -२, जातीचे प्रमाणपत्र -१ तसेच वारस तपासबाबतचा आलेला १ अर्ज स्वीकारला.
सदर संपूर्णकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. गोडे ग्राम महसूल अधिकारी करंजे  यांनी केले. या कार्यक्रमास फोंडाघाट ग्रामस्थांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाकरिता फोंडाघाट महसूल मंडळातील ग्रामस्थ व लाभार्थी यांचबरोबर  फोंडाघाट महसूल मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलीस पाटील उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!