भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*भाजपा सिंधुदुर्गतर्फे राष्ट्रभक्तीचा जयघोष – वेंगुर्ला तालुक्यात भव्य देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा*

*स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांची देशभक्तीने भारलेली साद*

*वेंगुर्ला – प्रतिनिधी*

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेचा सन्मान करणारी एक सुरम्य सांस्कृतिक स्पर्धा वेंगुर्ला तालुक्यात पार पडत आहे. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ला तालुका मर्यादित प्रशालांकरिता भव्य समूहगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यामध्ये प्राथमिक (इ. ५ वी ते ७ वी) आणि माध्यमिक (इ. ८ वी ते १० वी) गटांतील विद्यार्थी यांना सहभाग घेता येईल.
ही स्पर्धा दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी २.३० वा. वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे पार पडणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता आणि शिस्त वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🏆 पारितोषिके (प्रत्येकी चषक व प्रमाणपत्रासह रोख रक्कम):
🔹 माध्यमिक गट (८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक – ₹ ३५००
द्वितीय क्रमांक – ₹ २५००
तृतीय क्रमांक – ₹ १५००
चतुर्थ क्रमांक – ₹ ५००
पाचवा क्रमांक – ₹ ५००

🔸 प्राथमिक गट (५ वी ते ७ वी)

प्रथम क्रमांक – ₹ २५००
द्वितीय क्रमांक – ₹ २०००
तृतीय क्रमांक – ₹ १०००
चतुर्थ क्रमांक – ₹ ५००
पाचवा क्रमांक – ₹ ५००
(सर्व विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.)

समूहगीत गायन स्पर्धेची नियमावली:

एका शाळेस एकाच गटात सहभागी होता येईल.
दोन्ही गटात प्रथम नाव नोंदणी केलेल्या फक्त १० संघाना प्रवेश देण्यात येईल.
गाण्याचे स्वरूप –
राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी, संस्कारक्षम गीत असावे.
मराठी, हिंदी वा संस्कृत भाषेतील गीत स्वीकारले जाईल.
चित्रपट गीत टाळावीत. पारंपरिक किंवा प्रसिद्ध देशभक्तिपर गीतांना प्राधान्य दिले जाईल.
सादरीकरणाची वेळ –
कमाल वेळ ७ मिनिटे
सहभागी संख्या –
किमान ६ आणि कमाल १५ विद्यार्थी

वाद्य वापर –
हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ इ. मर्यादित वाद्ये वापरण्यास परवानगी असेल तर रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा वापरण्यास सक्त मनाई राहील.

वेशभूषा व सादरीकरण –
शाळेस किंवा गीतास साजेशी पोशाखात सादरीकरण
बॅनर, नृत्यसदृश हालचाली वर्ज्य
शुद्ध गायन व सुसंवादावर भर

मूल्यमापनाचे निकष –
सूर, ताल, शब्द स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय व शिस्त

नोंदणी अंतिम तारीख –
१० ऑगस्ट २०२५ पर्यंत शाळांनी नावनोंदणी पूर्ण करावी

निर्णय अंतिम –
परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील

नाव नोंदणी आणि नोंदणी अर्ज आणि अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक:
सई चेंदवणकर ७७१९९८३०६३

तरी जास्तीत जास्त प्रशालानी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!