*कोंकण एक्सप्रेस*
*कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी..*
*घरोघरी जात करत आहेत ‘स्वच्छ कलमठ संकल्प’ प्रचार ;कलमठ ग्रामपंचायतीचा स्वच्छतेचा जागर..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कलमठ गावात कचरा संकलन नव्या नियमात १ ऑगस्ट पासून करण्यात येत आहे.त्यानुसार कलमठ बिडयेवाडी येथे स्वच्छता जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कचरा व्यवस्थापन पत्रक वाटप करण्यात आली. नव्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी कलमठ उपसरपंच दिनेश गोठणकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, माजी सरपंच महेश लाड ग्रामपंचायत सदस्य पप्पू यादव, प्रीती मेस्त्री, तनिष्का लोकरे, अनुप वारंग, सचिन खोचरे, श्रेयश चिंदरकर, संजय गुरव, बाबू नारकर, संजय गुरव, संतोष मेस्त्री, भूषण पवार, नितेश मेस्त्री, प्रणय शिर्के, तेजस लोकरे,गणेश पुजारे, संतोष मेस्त्री,समीर रजपूत, ऋत्विज राणे ,भाग्यलक्ष्मी लोके,रसिका चव्हाण,श्रध्दा चव्हाण,गायत्री चाफेकर ,शैलजा मुखरे,राधिका पुजारे,ओंकार मेस्त्री, आशिष मेस्त्री, जयेश नेवगी, शुभम पांचाळ, अनिरुद्ध दळवी, प्रथमेश गोसावी, चिन्मय लाड, मयूर गावडे, दर्शन मेस्त्री, आदेश नाडकर्णी, आदित्य पालव, ईशा गुरव, आरोही गुरव
आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.