*सेस फंडातून हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे बांधकाम*

*सेस फंडातून हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे बांधकाम*

*कोंकण एक्सप्रेस*

*सेस फंडातून हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे बांधकाम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी- प्रथमेश गुरव*
स्वच्छ भारत आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यवर्धक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला शाळा नं.४ येथे हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे आदर्शवत बांधकाम करण्यात आले असून त्याचा उद्घाटन समारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
या उपक्रमासाठी जिल्हापरिषद सिंधुदुर्ग यांच्या सेस फंडातून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचा उपयोग समग्र अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने बांधकाम करण्यासाठी करण्यात आला.
उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते उमेश येरम, बाळू देसाई, प्रज्ञा परब, मुख्याध्यापक संध्या बेहरे, शिक्षक संतोष परब, सुधर्म गिरप, सानिका कदम, सुनंदा खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हर्षल परब, अस्मिता राऊळ, वासुदेव परब यांसह अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
वेंगुर्ला नं.४ या शाळेतील बांधकामाची गुणवत्ता, रचना आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार केलेली सुविधा ही वेंगुर्ला तालुक्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरावी असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन संतोष परब यांनी केले. तर आभार संध्या बेहरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!