*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे सेवानिवृत्त*
*वेंगुर्ला प्रतिनिधी-प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे हे २६ वर्षांच्या प्रदिर्ष सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा हायस्कूलचे माजी विद्यार्थी तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.
श्री. कांबळे यांनी वेंगुर्ला हायस्कूलमध्ये १८ वर्षे शिक्षक पर्यवेक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून कामगिरी बजावली आहे. मुख्याध्यापक पदावर काम करत असताना श्री.कांबळे यांनी विद्यार्थी कल्याण आणि शिस्त यामुळे हायस्कूलला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तसेच दहावी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली असल्याचे प्रसन्ना देसाई म्हणाले. सत्कार समारंभावेळी माजी मुख्याध्यापक एस.एस.काळे, पालक शिक्षक संघाचे नितीन बांदेकर, आनंद परब, रवी थोरात, रमेश वाघमारे, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, सिधुदुर्ग अध्यापक संघाचे पदाधिकारी, वेंगुर्ला तालुका क्रीडा पदाधिकारी आदी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे आपण चांगले काम करू शकलो. मी आपल्या सदैव सर्वांच्या ऋणामध्ये राहीन असे प्रमोद कांबळे यांनी सांगितले.
