*कोंकण एक्सप्रेस*
*साळीस्ते केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तळेरे येथे उत्साहात संपन्न*
*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नं. १ येथे साळीस्ते केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. या परिषदेसाठी साळीस्ते केंद्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, तसेच मार्गदर्शक म्हणून श्रीम. बुचडे मॅडम व श्रीम. यमगर मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व देवी सरस्वतीच्या पूजनाने झाली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. नृत्यकलेसह ईशस्तवन सादरीकरणास विद्यार्थ्यांना श्रीम. फोंडेकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच स्वागत गीतास श्री. नानचे सर यांच्या वाद्य संगीताची साथ लाभली.
फलक लेखनाच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सौंदर्यात भर टाकणारे श्री. मेस्त्री सर यांचे कला कौशल्य विशेष उल्लेखनीय ठरले. उपस्थित सर्वांचे गुलाब पुष्प व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विभुते सर यांनी केले. प्रस्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. पावसकर सर यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मा. श्री. राजेश जाधव यांनी शुभेच्छा देत उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले.
स्नेहभोजनासाठी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. गोसावी मॅडम व पालक श्रीम. महाडिक मॅडम, तसेच वैष्णवी काकी, जाधव काकी व मानसी काकी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अथक मेहनत घेतली. मार्गदर्शकांनी उपस्थित शिक्षकांना उपयुक्त मार्गदर्शन दिले.