तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धेचा उद्या २ ऑगस्ट २०२५ रोजी बक्षीस वितरण समारंभ

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धेचा उद्या २ ऑगस्ट २०२५ रोजी बक्षीस वितरण समारंभ

*कोंकण एक्सप्रेस*

*तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धेचा उद्या २ ऑगस्ट २०२५ रोजी बक्षीस वितरण समारंभ*

*लहान गटात चिन्मय दीपक पांचाळ प्रथम तर मोठ्या गटात श्रावणी दीपक पांचाळ प्रथम*

*कासार्डे प्रतिनिधि :संजय भोसले*

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धा- २०२५ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लहान गटात चिन्मय दीपक पांचाळ यांने प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मोठ्या गटात श्रावणी दीपक पांचाळ हीने
प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोन्ही विद्यार्थी तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी असून ते सख्खे भाऊ-बहिण आहेत.

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तळेरे, कासार्डे, खारेपाटण, नडगिवे, बुरंबावडे विद्यालयातील तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या रंगभरण स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. बाळशास्त्री जांभेकर यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी ही रंग भरण स्पर्धा घेण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची अतिशय सुबक व्यक्तिरेखा रेखाटली होती. पाचवी ते सातवी लहान गट आणि आठवी ते दहावी मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहे. गट- अ : १) प्रथम क्रमांक- चिन्मय दीपक पांचाळ – इयत्ता सहावी – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे
२) द्वितीय क्रमांक- रोहन संजय खानविलकर – इयत्ता सातवी – कासार्डे माध्यमिक विद्यालय, कासार्डे
३) तृतीय क्रमांक- ओमप्रार्थ ओंकार महाडिक – इयत्ता पाचवी – आदर्श प्राथमिक शाळा तळेरे क्र.१, तळेरे
४) उत्तेजनार्थ प्रथम- नशरा नूरमोहम्मद पावसकर – इयत्ता सातवी – नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल, नडगिवे
५) उत्तेजनार्थ द्वितीय- विक्रांत प्रकाश खांडेकर – इयत्ता सहावी – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, बुरंबावडे

गट- ब : १) प्रथम क्रमांक- श्रावणी दीपक पांचाळ – इयत्ता नववी – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे
२) द्वितीय क्रमांक- स्वयम् मिलिंद महाडिक – इयत्ता नववी- वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे
३) तृतीय क्रमांक- नववी सानिका टोपान्ना गावडे – इयत्ता नववी – शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण
४) उत्तेजनार्थ प्रथम- ताजिम मुस्ताक अहमद पटेल – आठवी – शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण
५) उत्तेजनार्थ द्वितीय- प्रियंका प्रकाश शिंगे – नववी – वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय, तळेरे

या रंगभरण स्पर्धेसाठी दोन्ही गटातील प्रथम, व्दितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी दोन क्रमांक काढण्यात आले आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सांस्कृतिक भवनात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह तसेच सन्मान पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना देखील सन्मान पत्र देण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनी, सहभागी विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी या समारंभाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष- उदय दुधवडकर, सचिव -संजय खानविलकर व खजिनदार- निकेत पावसकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!