उद्याचा कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद

उद्याचा कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद

*कोकण Express*

*उद्याचा कणकवलीचा आठवडा बाजार पूर्णता बंद*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती*

*कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचा निर्णय*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मंगळवारी कणकवलीचा भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पूर्णपणे बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कणकवलीचा दर मंगळवारी भरणारा आठवडा बाजार हा बंद राहील अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरात आठवडा बाजाराच्या दिवशी लागणारी रस्त्यावरील दुकाने लावता येणार नाहीत. इतर दुकाने जरी सुरू असली तरी आठवडा बाजाराच्या दिवशी ज्या पद्धतीने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते ती गर्दी रोखण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. व त्याची काटेकोर अंमलबजावणी उद्या केली जाणार आहे. नियम मोडलेले आढळल्यास कारवाई देखील केली जाणार आहे. त्यामुळे जनतेने देखील आठवडा बाजारासाठी कणकवलीत गर्दी करू नये असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे आदी नियमांचे काटेकोर पालन करा असेही आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!