*कोंकण एक्स्प्रेस*
*जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी मंथन उकर्डे याची निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भारतीय जिम्नॅस्टिक्स संघातर्फे ८ ते १० आॅगस्ट कालावधीत देहरादून-उत्तराखंड येथे सर्व वयोगटातील ट्रॅम्पोलिन आणि टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी बारा वर्षांखालील गटात मंथन पराग उकर्डे यांची निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी १२ जुलै रोजी मुंबई-वडाळा येथे झाली होती. यात मंथन याने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय निवडी चाचणी २२ जुलै रोजी झाली होती. त्यात त्याने महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकाविला होता. आता राष्ट्रीय स्तरावरील ट्रॅम्पोलिन आणि टम्बलिंग जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मंथन हा महाराष्ट्राच्या टीममधून खेळणार आहे. मंथन याला प्रशिक्षिक शुभम पांडुरंग तांबे, अजय म्हापुस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी मंथन याची निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.