*कोंकण एक्सप्रेस*
*मठ येथे कृषी माहिती केंद्राचा शुभारंभ*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत कृषीदूतांच्या पुढाकारातून मठ ग्रामपंचायतीमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतक-यांसाठी मार्गदर्शनाचे केंद्र ठरणा-या या उपक्रमाचा शुभारंभ सरपंच रूपाली नाईक यांच्या हस्ते झाले.
या कृषी माहिती केंद्रामध्ये फळरोपे बागायती पिके, मसाला पिक, पालेभाज्या लागवड पद्धती, फवारणीची काळजी, कीड व बांडगुळ नियंत्रण, कंपोस्ट व जीवामृत तयार करण्याच्या पद्धती यांसह अनेक विषयांवर फलकांद्वारे माहिती उपलब्ध करून दिली आहे. तसेच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने विकसित केलेल्या पिकांच्या जाती, बांडगुळ नियंत्रणासाठी ‘अमर हत्यार‘, चिकू काढणीसाठी नूतन झेला व आंबा काढणीसाठी अमर झेला, आंबा व काजू फवारणीसाठी आम्रशक्ती द्रावण व फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळे यांसारख माहितीही या केंद्रात दिली जात आहे.
केंद्राच्या शुभारंभप्रसंगी उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठात डॉ.विजय दळवी, कीटकशास्त्रज्ञ डॉ.संदिप गुरव, कृषी विस्तारतज्ज्ञ डॉ.एम.पी.सणस, डॉ.मोरे, प्रगतशील शेतकरी शिवराम आरोलकर, युवराज ठाकूर, प्रकाश परब, कृषिदूत विवेक कांबळी, अनिकेत देईकर, मानस प्रभू, भूषण माणगांवकर, सार्थक शिदे, रोहन खाडे, संदिप कुमावत आदी उपस्थित होते. सार्थक शिदे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विवेक कांबळी यांनी केले. तर आभार मानस प्रभू यांनी मानले.
